अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला इराण देणार प्रत्युत्तर!

23 Jun 2025 14:07:00

वॅाश्गिंटन(Attack on Iran):अमेरिकेने इराणच्या प्रमुख अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर इराणचे प्रत्युत्तर काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेने ३०,००० पौंड वजनाच्या बंकर-बस्टर बॉम्बर्सच्या साहाय्याने इराणच्या फोर्डो अणुस्थळावर हल्ला केला. यानंतर इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांना उद्धवस्त करण्याची धमकी दिली आहे. "आम्हाला स्वतःचे रक्षण करण्याचे अधिकार आहेत", असे इराणने अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांत राहण्याचे आवाहन केले. तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार अली अकबर वेलायती म्हणाले की, “अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून आम्ही पण हल्ला करू”, असे त्यांनी इराणी वृत्तसंस्थेने प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, “ जर आमच्या प्रदेशात अमेरिकन सैन्याने दुसऱ्या देशाच्या भूमीवरून हल्ला केला तर अमेरिकेसोबतच त्या देशावरही आम्ही हल्ला करणार.”

या इराणच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने रविवार, दि.२२ जून रोजी अमेरिकन नागरिकांसाठी जगभरात सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, "मध्य पूर्वेतील संघर्षामुळे परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांची सुरक्षा धोक्यात येईल. अमेरिकन नागरिकांविरुद्ध निदर्शने होण्याची शक्यता आहे", असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सुरक्षेच्या सतर्कतेबाबत म्हटले आहे.

युद्धाच्या दरम्यान अमेरिकेकडून सोमवारीही क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. या युद्धात अमेरिका उघडपणे इस्रायलकडून उभा असल्यामुळे इस्रायली लष्करांनी ,मोठ्या प्रमाणात पश्चिम इराणमधील लष्करी ठिकाणांवर हल्ला केला आहे. इराणच्या तेल अवीव शहरामध्ये या हल्ल्याने अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत तर काही जण जखमी झाले आहेत. याचबरोबर अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत आणि तेल शुध्दीकरण कारखान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.



Powered By Sangraha 9.0