Type something to search articles
सांगली जिल्ह्यात मुलीला सराव परीक्षेत कमी गुण का मिळाले? अशी विचारणा करत तिच्या जन्मदात्या पित्यानेच तिला बेदम मारहाण केली. यात त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार, २० जून रोजी सांगलीतील आटपाडी परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) वार्षिक अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारक बैठक यावर्षी देशाची राजधानी दिल्ली येथे आगामी ४, ५ आणि ६ जुलै २०२५ रोजी आयोजित केली जात आहे. ही बैठक दिल्लीतील 'केशवकुंज' या संघ कार्यालयात होणार आहे.
मुंबईत मरीन लाईन्स परिसरात एका इमारतीत मोठी आग लागली. सोमवार, २३ जून रोजी दुपारी १२:२६ वाजता 'मरीन चेंबर्स' या इमारतीत पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. ही इमारत झाफर हॉटेलजवळ आणि गोल मशीद शेजारी आहे. फ्लॅट क्रमांक ५०२ मध्ये ही आग लागली. लाकडी फर्निचर, वायरिंग, गॅस ट्यूब, गादी, छत आणि घरातील इतर वस्तूंमुळे आग पसरली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. सोमवार, २३ जून रोजी संसदीय अंदाज समितीच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवनात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या फलकावरून संदीप देशपांडेंची जीभ घसरली.
उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या नाराजीच्या बातम्या चुकीच्या असून मी नाराज नाही असे ते म्हणाले. सोमवार, २३ जून रोजी त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआई) ने डॉ. अजित पाठक यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे.
Strait of Hormuz : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर चवताळलेल्या इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या दहा शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला आहे. यानंतर इराण कच्चे तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता इराणच्या कायदेमंडळाने होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदी निर्णयाला मान्यत
होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केली आहे. एकीकडे मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चा सुरु असताना या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
"उबाठा सेनेची अवस्था धोकादायक आणि जिर्ण!" मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीकाशिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा! शरद पवारांचं टेन्शन वाढलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागची १० वर्ष आपण आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय. परंतु योगसाधना म्हणजे केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून, योगसाधना हा आपल्या जीवनशैलीचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. नेमकी ही जीवनशैली कशी अंगिकारावी हेच आज आपल्याला सांगणार आहेत योग विद्यानिकेतन या संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गादास सावंत. ३० वर्षांहून अधिक काळ योग अध्यापनाचा अनुभव असलेले दुर्गादास सावंत, आयुष मंत्रालयाच्या भारतीय मानक ब्युरो या संस्थेचे सदस्य सुद्धा आहेत.
पावसाळ्यात मान्सूनपूर्व आणि दरम्यानही पश्चिम रेल्वे मार्गातील भुयारी गटारांच्या स्वच्छतेवर आता कॅमेराची नजर ठेवली जाणार आहे. नेमके काय आहे हे तंत्रज्ञान ? पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली माहिती.
कोणत्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलंय? जागावाटपाची समीकरणं काय आहेत? बिहारच्या राजकारणात काय घडतंय?
विशेष प्रतिनिधी पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा जगातील सर्वात धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या योजनेदरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केंद्र सरकार इंधन पुरवठ्याची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा कशासाठी? काय आहे महापालिकेचं पक्षीय बलाबल?